शेकापच्या ‘ढोल बजाओ’ आंदोलनाची बँक प्रशासनाने घेतली दखल: जिल्हाभरातील बँकांना दिले कर्ज वितरणाचे आदेश

  शेकापच्या ‘ढोल बजाओ’ आंदोलनाची बँक प्रशासनाने घेतली दखल: जिल्हाभरातील बँकांना दिले कर्ज वितरणाचे आदेश गडचिरोली: ऐन रोवणी हंगाम भरात असताना जिल्ह्यातील बँका पीक कर्जासाठी विविध कारणे देवून शेतकऱ्यांना नागविण्याचे काम करीत असल्याने बँकांच्या अड्डेलतट्टू कारभाराचा निषेध आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी ७ तारखेला गडचिरोली येथील सर्व बँकांच्या जिल्हा शाखांसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शेतकरी कामगार पक्षाने दिलेल्या इशाऱ्याची जिल्हा बँक प्रशासनाने गंभीर दखल घेत जिल्ह्यातील सर्व बँकांना शेतकऱ्यांना नागविण्याचा प्रकार थांबवून तात्काळ कर्जमंजूरी व वितरण करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच यानंतरही शेतकऱ्यांचे कर्जप्रकरणी अड्डेलतट्टूपणाचे…

हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढू: ७३ व्या वर्धापन दिनी शेकापचा निर्धार

हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढू: ७३ व्या वर्धापन दिनी शेकापचा निर्धार गडचिरोली: देशात आणि राज्यात सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्ष हे भांडवलदार धार्जिने असल्याने सामान्य माणसाच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आता रस्त्यावरच्या आंदोलनाची स्वतंत्र भूमिका घेवून सामान्य जनतेचा लढा उभारणे गरजेचे आहे,असे मत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी व्यक्त केले. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पक्षाचा लाल बावटा फडकविल्यानंतर झालेल्या बैठकीत भाई रामदास जराते यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. धानाला रुपये ३५००/- हमीभाव मिळाला पाहिजे.अन्यायकारक लॉकडावून मुळे रोजगार हिरावलेल्या नोंदणीकृत बांधकाम…