कृषी संस्कृतीचा सण : नागपंचमी

  – भाऊराव बेंडे नागपंचमी हा सबंध भारतामध्ये साजरा केला जाणारा अब्राह्मणी सन आहे. अब्राह्मणी सन असण्याचे कारण ज्या सन उत्सव, परंपरा यामध्ये कुठल्याही प्रकारचे शोषण होत नाही त्यासाठी कुठल्याही पूरोहिताची मध्यस्थी लागत नाही, ते कृषी संस्कृतीशी नाते सांगतात ते सर्व अब्राह्मणी. या सणाचा भारतीय हिंदू समाजावर प्रचंड प्रभाव आहे त्यामुळे त्या सणाची दखल घेणे महत्वाचे आवश्यक आहे. नागपंचमी सणाचा भारतीय जनमानसावर असलेला प्रभाव: ————————————- सबंध भारतामध्ये नागदेवतांची प्राचीन अशी मंदिरे अगदी जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेली आहेत. भारतामध्ये क्वचितच असे एखादेच राज्य असेल की जिथे नाग मंदिरं नसतील. भारताच्या अति उत्तरेकडील उत्तराखंड राज्यांमध्ये…

ज्वारी व गव्हाची मदत : कळंब तालुका शेकापचा स्तुत्य उपक्रम

महाड पुरग्रस्तांसाठी भाई बाळासाहेब धस यांच्या नेतृत्वात कळंब वरुन धान्य रवाना कळंब (९ ऑगस्ट) : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील महापुरग्रस्त भाऊ – बहीणींसाठी स्वच्छ ज्वारी व गहु येत्या आठवड्याभरात पाठवून देण्याचा निर्णय पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित बैठकीत घेण्यात आला होता.सदरच्या ठरावावर अंमलबजावणी करीत आज ९ ऑगस्ट ला कळंब तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे २५ क्विंटल ज्वारी व गहू महाड पुरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आले. सदरची मदत ही फक्त कळंब तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांच्या कडुनच संकलित करण्यात येईल असाही ठराव करण्यात आला होता. त्यानुसारच आज पक्षाचे तालुका चिटणीस भाई बाळासाहेब…

क्रांतिदिनी अंबेजोगाईत निघाला शेकापचा लक्षवेधी बैलगाडी मोर्चा

शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी न लागल्यास रुमने हातात घेऊन आंदोलन करू- भाई मोहन गुंड आंबेजोगाई (९ ऑगस्ट) : शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर क्रांतीदिनी शेतकरी कामगार पक्षाचा आंबाजोगाई येथे सोमवार दि ९ ऑगस्ट रोजी शेकापचे युवा नेते भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. अंबाजोगाई शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून बैलगाडी मोर्चाला सुरुवात करण्यात आली हा बैलगाडी मोर्चा अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी शेतकऱ्यांनी काळ्या फिती लावून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. शेकापचे जेष्ठ नेते गणपत देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाची सांगता करण्यात आली. या वेळी अ‍ॅड नारायण…

उरण – पनवेल मध्ये शेकापक्षाला गतवैभव प्राप्त होणार : आमदार भाई बाळाराम पाटील

७४ व्या वर्धापनदिनी ‘परंपरा संघर्षाची, वज्रमूठ निर्धाराची’ हा संकल्प केला जाहीर उरण ( २ ऑगस्ट) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण आणि कर्नाळा सहकारी बँक प्रकरणावरून विरोधकांनी शेतकरी कामगार पक्षाला एकटे पाडण्यासाठी बदनामीकारक कट कारस्थाने चालविलेले आहेत.मात्र शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांना विरोधकांचे मनसुबे लक्षात आले असून उरण – पनवेल क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाचे गतवैभव येणाऱ्या काळात परत मोठ्या ताकदीने प्राप्त करु,असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला. भाई बाळाराम पाटील म्हणाले, उरण – पनवेल क्षेत्रातील संपूर्ण जिल्हा परिषद गटांमधील कार्यकर्त्यांसोबत सुसंवाद उपक्रम राबविण्यात आला असता कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह…

लाल बावटा खांद्यावर घेऊन लढत राहू : भाई धैर्यशील पाटील

प्रमोद पाटील यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर पेण (२ ऑगस्ट) : शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा जाती, धर्माच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन नेहमीच काम करत आलेला आहे. सध्याची परिस्थिती बिकट असली तरीही शेकापक्षाचा  लाल बावटा खांद्यावर घेऊन जनसामान्यांचे काम करत राहू,असा आशावाद शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार भाई धैर्यशील पाटील व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन पेणमध्ये साधेपणाने पार पडला. या दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषदेचे सभापती प्रमोद पाटील यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शेकाप कार्यालया समोर माजी आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. शेकाप…

जनतेच्या समस्या मांडा, शेकापक्षाचे विचार घराघरात पोहोचवा

माजी आ.पंडितशेट पाटील यांचे आवाहन,वर्धापन दिन साधेपणाने साजरा माणगाव (२ ऑगस्ट) : शेतकरी कामगार पक्षाने कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसले नाही.मात्र शेकापच्या पाठीत आपण विश्‍वास दाखविलेल्या आपल्याच मित्रांनी खंजीर खुपसल्यामुळे आमदारकीच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शेकापला अपयश आले.शेकाप हा पराभवाला डगमगणारा पक्ष नाही.शेकापला कोणीही संपवू शकणार नाही. येणार्‍या काळात जनतेचे प्रश्‍न,पक्षाची ध्येय धोरणे विचारधारा सर्वत्र पोहचवून समाजात प्रभावीपणे काम करा असे आवाहन माजी आमदार पंडितशेट पाटील यांनी माणगाव येथे पक्षाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. शेतकरी कामगार पक्षाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त माणगाव कुणबी भवन येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आजरोजी…