राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या: भाई जयंत पाटील

  परतीच्या पावसाने कोकणासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान मुंबई( १७ ऑक्टोबर ): परतीच्या पावसाने कोकणासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकर्‍यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली. गेल्या ३ ते ४दिवसांपासून परतीच्या पावसाने कोकणासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजविला. शेतकर्‍यांचे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीसाठी राज्य सरकारला गळ घालत आहेत. शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतीय. राज्यशासनाने पंचनाम्याचे आदेश…

ओला दुष्काळ जाहीर करा : शेकाप नेते माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करा : शेकाप नेते माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांची मागणी श्रीवर्धन (१६ ऑक्टोबर) : कोकणातील शेतकऱ्यांना पुढील वर्षभर शासनाने मोफत धान्य द्यावे, शेतकऱ्यांना मोफत वा सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध करून द्यावे. शंभर युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे यासारख्या मागण्या मांडत माजी आमदार पंडितशेट पाटील यांनी कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांनी केली आहे. माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांनी श्रीवर्धन भागात परतीच्या प्रवासाने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर संपूर्ण कोकणात मोठी नुकसान झालेली असल्याने सरकारकडे ही मागणी केलेली आहे. पत्रकारांशी बोलताना ते…

मासेमारी नौकांना मासे विक्रीच्या परवानगीचे आदेश द्या : शेतकरी कामगार पक्षाची अदिती तटकरे यांच्याकडे मागणी

  पनवेल (२९ सप्टेंबर): कोविड 19 चा प्रादुर्भाव तसेच मच्छिमारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी करंजा संस्थेने सादर केलेल्या यादीतील १०० मासेमारी नौकांना तात्पुरत्या स्वरूपात / कालावधीत त्यांच्या करंजा बंदर येथे मासे विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, विधान परिषदेचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी उद्योग,खनिकर्म,पर्यटन, फलोत्पादन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार भाई बाळाराम पाटील यांनी अदिती तटकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रायगड जिल्हयातील करंजा संस्थेच्या यादीतील नमूद मासेमारी नौका मुंबई शहर जिल्हयात कार्यरत असून नविन भाऊचा धक्का व ससून डॉक बंदरातील वर्तमान…

अन्यायकारक कृषी विधेयके देशात कुठेही लागू करु नका : शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रपतींना विनंती

  अन्यायकारक कृषी विधेयके देशात कुठेही लागू करु नका : शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रपतींना विनंती गडचिरोली (२५ सप्टेंबर): कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल, आवश्यक वस्तू कायद्यात बदल आणि कंत्राटी शेती अशी तीन कृषीविरोधी विधेयके केंद्र सरकारने नुकतीच संख्याबळावर रेटून बेकायदेशीरपणे संसदीय कार्यपद्धतीचे सर्व संकेत व नियम पायदळी तुडवून पास करून घेतलेली आहेत. सदरचे घटनाबाह्य, शेतकरीविरोधी कृषी विधेयके देशात कुठेही लागू करण्यात येवू नये, अशी विनंती भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे राष्ट्रपतींना करण्यात आली. आज देशभरातील २६० राजकीय ,शेतकरी, शेतमजूर संघटना एकत्र येऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या मार्फत सदरच्या अन्यायकारक विधेयकांवर माननीय राष्ट्रपती यांनी…

वाढीव विद्युत बिले माफ करा: अन्यथा आंदोलन – शेकापचा इशारा

वाढीव विद्युत बिले माफ करा: अन्यथा आंदोलन – शेकापचा इशारा अलिबाग : लॉकडावूनमुळे आधीच आर्थिक संकटात असताना निसर्ग चक्रीवादळाने उध्वस्त झालेल्या रायगडकरांना महावितरणने शॉक देत वाढीव तसेच सरासरी बिल दिल्याने जनता त्रस्त आहे. त्यामुळे वाढीव बिलं रद्द करून ३०० युनिट पर्यंतची सर्व वीजबिले माफ करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत शेतकरी कामगार पक्षाने महावितरणला अल्टिमेटम दिला आहे. शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेकापक्षाच्या शिष्टमंडळाने आज महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजित पिंगळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी तालुका चिटणीस अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शनी पाटील, अनिल…

शेकापचा ७३ वा वर्धापन दिवस राज्यभरात उत्साहात साजरा

शेकापचा ७३ वा वर्धापन दिवस राज्यभरात उत्साहात साजरा पुन्हा नव्या जोमाने पक्ष संघटना बळकट करण्याचा भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केला आशावाद   अलिबाग: रायगडसह संपूर्ण राज्यभरात रविवारी शेतकरी कामगार पक्षाचा ७३ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत मी आता ६५ वर्षाचा झालोय,तरीही मी थकलेलो नाही, मी मरगळलेलो नाही,नव्या उमेदीने,नव्या जोशाने पुन्हा शेकाप उभारणीसाठी प्रयत्न करतोय,नव्या पिढीनंही आपले योगदान द्यावे,असे भावनिक आवाहन केले. या कार्यक्रमाला जिल्हा चिटणीस ऍड,आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, पं.स.सभापती…